बाणा च्या निशाना वर भाजप| दोन बडे नेते शिवसेनेच्या गळाला, दिला मोठा धक्का

शिवसेना आणि भाजपमधील राजकीय द्वंद्व आणखी पेटण्याची चिन्ह आहेत. शिवसेने नाशिकमधील भाजपचे दोन नेते फोडल्याची चर्चा आहे. या दोन नेत्यांनी

shiv sena

मुंबईः नाशिकमध्ये भाजपने शिवसेनेला काही दिवसांपूर्वी धक्का दिला. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये (bjp) प्रवेश केला. आता शिवसेनेने भाजपला दणका दिला आहे.

नाशिकमधील भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेच्या गळाला लागल्याचं बोललं जातंय. यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

माजी आमदार वसंत गिते आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल हे शिवसेनच्या वाटेकर असल्याचं सांगण्यात येतंय. या दोन्ही नेत्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( ( uddhav thackeray ) ) यांची भेट घेतल्याची माहिती विश्वनिय सूत्रांनी दिली आहे.

वर्षा बंगल्यावर वसंत गिते आणि सुनील बागुल यांची मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला
नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि युवासेनेचे नेते वरून सरदेसाई देखील होते, असं सांगितलं जातंय. सुनील बागुल आणि वसंत गिते हे दोन्ही नेते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत.

नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गेल्या महिन्यात २१ डिसेंबरला भाजपमध्ये प्रवेश केला. सानप हे आधी भाजपमध्येच होते. पण भाजपला रामराम करत ते राष्ट्रवादीत गेले.

नक्की वाचा : 10+ Free Marathi Movie Download websites List | New Marathi Movie Download

त्यानंतर ते शिवसेनेत गेले. बाळासाहेब सानप हे स्वगृही परतल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता.

नमसकर मित्रानो में अपाल स्वागत करते अप्लाय या वेबसाइट वर आम्ही येते राजकीय न्यूज़ देता

Leave a Comment